कोलकत्ता, ११ मार्च २०२१ : पश्चिम बंगालमधील निवडणूकीच्या मैदानात चांगलाच खेळ रंगताना दिसत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये बंगाल साठी कस लावताना दिसत आहेत.अश्यातच ममता बॅनर्जी वर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.ज्या मधे त्यांना मार लागला आहे.
“नंदीग्रामधील प्रचारादरम्यान माझ्यावर ४ ते ५ लोकांनी हल्ला केला,अचानक माझ्याजवळ हे लोक आले आणि त्यांनी धक्का बुक्की केली ज्यामधे माझ्या पायाला गंभीर इजा झाली.”असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजकीय द्वेषातून त्यांच्यावर हल्ला झाला आसून आपल्याला इजा व्हावी म्हणून हे कृत्य करण्यात आले असेही त्या म्हणाल्या.त्यांना कोलकत्याला हलवण्यात आले आहे.ममता भाजपच्या शुभेंदू आधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत.ज्या वेळी हि घटना घडली त्यावेळी ममता बरोबर पोलीस नव्हते.
प्रचारावेळी झालेल्या हल्ल्यात ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांच्या पायाला खांद्याला दुखापत झाली आसून त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या आहेत ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आहे.असे डाॅक्टरांनी सांगितले.तसेच पुढील ४८ तास ममता बॅनर्जी वर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाईल असही ते म्हणाले.
घटनेवर काँग्रेसची टिका
“सहानभुती मिळवण्यासाठी ममताचा हा राजकीय ढोंगीपणा आहे.नंदीग्रामध्ये अडचणीचा अनुभव घेताच त्यांनी नाटक बनवण्याची योजना केली.त्या केवळ मुख्यमंत्रीच नाही तर त्या पोलीसमंत्री देखील आहेत.एकही पोलीस मुख्यमंत्र्या बरोबर नव्हते?यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता का?”अशी टिका काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल जाधव