मुंबई १५ जुलै, २०२२ : बंडखोर पक्ष विरुद्ध संजय राऊत हे युद्ध सध्या जोरदार सुरु आहे. त्यानुसार आजही आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी दोघांकडून एकमेकांकडे झाडल्या गेल्या. संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
मुख्यमंत्री येतात- जातात, तर काही मुख्यमंत्री हे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले. महाराष्ट्रात अजूनही तीन पक्षाचेच सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आदर्शाने चालणारे पक्ष आहेत. एखादे नेते औरंगजेब याच्या कबरीपुढे नतमस्तक होतात आणि औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे, असे नेते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. असा वार संजय राऊतांनी केला आहे.
पण यावेळी एकनाथ शिंदेनीदेखील संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिले. अडीच वर्षात शिवसेनेतल्या आमदारांचे कुठलेही काम झाले नाही. आताचं सरकार म्हणे काय तर बेकायदेशीर सरकार आहे. शपथ दिलेले आम्ही बेकायदेशीर, अध्यक्ष बेकायदेशीर असं म्हणून आम्हाला हिणवंलं. आम्हाविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र सुप्रिम कोर्टाने याचिकाच फेकून दिली. अडीच वर्षात शिवसेनेला काहीच मिळालं नाही. उलट शिवसेनेला खोट्या केसेसना सामोरं जावं लागलं, अशी शब्दात एकनाथ शिंदें यांनी मनातले सल बोलून दाखवले. आमच्यावर आरोप करताना पक्ष संपवण्याची सुपारी नक्की कोणी घेतली, असा सवाल करताना त्यांनी संजय राऊतांना केला. स्वत: आत्मपरिक्षण करण्यापेक्षा आम्ही बंडखोर कसे, हे मात्र त्यांनी जनतेला दाखवून देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
सध्या संजय राऊत हे अतिशय आक्रमक रित्या बंडखोर पक्षावर वार करत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रतिउत्तर देऊन राऊतांना काही काळापुरते का होईना, गप्प केले असेच म्हणावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस