अंबोडी येथे जिवंत अर्भक पुरण्याचा प्रयत्न

पुरंदर, २८ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर हा प्रयत्न सोडून तरुणांनी येथून पळकढला आहे. हे अर्भक आता सुरक्षित असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जेजुरी येथे पाठवले आहे.

याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण शेतात खड्डा खणत होते. परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी लांबूनच त्यांना काय करताय? हे विचारले. मात्र यानंतर त्यांनी तेथून दुचाकीहून पळ काढला. मात्र जाताना ते अर्भक तिथेच सोडून दिले. यानंतर या नागरिकांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली.

यानंतर सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी साधारण दोन दिवसाचे जिवंत अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील तपासणीनंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण डी. एस. हाके करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा