अध्यापकाचा आमदार निवासातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मुंबई, १७ सप्टेंबर २०२०: औरंगाबादचे शिक्षक गजानन खैरे यांनी बुधवारी मंत्रालयाजवळील आमदार निवासस्थानाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  पोलिस आणि अग्निशमन दलानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचे प्रयत्न असफल झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत घटनास्थळी आले. त्यांच्या आश्वासनानंतर शिक्षक खैरे चौथ्या मजल्यावरून खाली आले.
राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी राज्यभरातील शिक्षक आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मागणीसाठी राज्यातील शिक्षक नाशिकला जाणार होते. त्यावेळी शिक्षक आणि सरकार यांच्यात चर्चा झाली होती.
शिक्षकांच्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी गजानन खैरे सातत्यानं मंत्रालयात चक्कर मारत होते, परंतु त्यांचं ऐकलं गेला नाही. यातून कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा