इस्रो मधील एका मोठ्या वैज्ञानिकास विष देऊन मारण्याचा प्रयत्न

दिल्ली/अहमदाबाद, ६ जानेवारी २०२१: इस्रोचे प्रख्यात वैज्ञानिक आणि अहमदाबाद स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक तपन मिश्रा यांनी दावा केला आहे की, २०१७ मध्ये त्यांना विष देण्यात आले होते. तपन मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हा दावा केला आहे. तथापि, त्यांनी असेही म्हटले आहे की त्यांना हे विष कोणी आणि का दिले याबद्दल काहीच कल्पना नाही.

तपन मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की हे विष बेंगळुरूमध्ये प्रमोशन मुलाखतीच्या वेळी देण्यात आलेल्या नाश्त्यात मिसळवून देण्यात आले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तपन मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की घरी दिली जाणारी आर्सेनिक सेंद्रिय असते. त्यांना दिलेले विष एक इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होते. याचा एक ग्रॅम मनुष्याला मारण्यासाठी पुरेसा आहे.

तपन मिश्रा म्हणाले की, यानंतर माझ्यावर सलग दोन वर्षे उपचार सुरू होते. त्यामुळे याविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. मी नशीबवान आहे कारण या विषामुळे कोणीही वाचणे शक्य नाही. मी येत्या जानेवारीमध्ये रिटायर होणार आहे. जर या कारणाने माझा मृत्यू झाला तर आपल्याला याचे कारण समजावे म्हणून मी ही माहिती आपल्या समोर मांडत आहे.

तपन मिश्रा यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, “इस्रोमधील मोठ्या वैज्ञानिकांच्या संशयास्पद मृत्यूची बातमी आपल्याकडे सातत्याने येत आहे. १९७१ साली प्राध्यापक विक्रम साराभाई यांचे निधन संशयास्पद होते. त्यानंतर १९९९ मध्ये व्हीएसएससीचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर १९९४ मध्ये श्री नंबीनारायण यांचे प्रकरणही सर्वांसमोर आले. पण मला माहित नव्हते की एक दिवस मी देखील या रहस्यमय घटनांचा एक भाग होईल.”

तपण मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिली आहे की, २३ मे २०१७ रोजी त्यांना जीव घेणे आर्सेनिक ट्राइऑक्साइड (Arsenic Trioxide) देण्यात आले होते. त्यानंतर ते गेल्या दोन वर्षांपासून गंभीर स्थितीत आहेत. आपल्या मुलाखतीनंतर ते कठीण परिस्थितीत बेंगलोरू हून अहमदाबादला परत आले होते.

अहमदाबादला परत आल्यानंतर त्यांना गुद्द्वार रक्तस्त्राव ( एनल ब्लीडिंग ) झाले होते. त्यांना अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्वचा बाहेर येत होती. हात आणि बोटांची नखे निघून गेली होती. न्यूरोलॉजिकल समस्या हापॉक्सिया, हाडदुखी, सेंसेशन, एकदा सौम्य हृदयविकाराचा झटका, आर्सेनिक डिपोजिशन, शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत अवयवांवर बुरशीजन्य संक्रमण यासारख्या समस्या येत होत्या.

तपन मिश्रा यांच्यावर झायडस कॅडिला अहमदाबाद, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथे उपचार झाले. या उपचारासाठी त्यांना सुमारे दोन वर्षे लागली. आपल्या दाव्याचा पुरावा म्हणून तपन मिश्रा यांनी तपास अहवाल, एम्सचा फॉर्म आणि हात पायांचे काही फोटो फेसबुकवरही पोस्ट केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा