कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये शिरुन विनयभंगाचा प्रयत्न, पुण्यातील जे.एस.पी.एम कॉलेजमधील घटना

पुणे, दिनांक १५ ऑक्टोबर २०२२: कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये शिरुन अनोळखी तरुणाने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील जे.एस.पी.एम कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये सदर प्रकार घडला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील हांडेवाडी रोडवर जे.एस.पी.एम फार्मसी कॉलेज आहे. कॉलेजलगतच हॉस्टेल आहे. या हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी हॉस्टेलमधील तिसऱ्या मजल्यावर मुलींच्या प्रसाधनगृहात एक अनोळखी व्यक्ती शिरला होता. तरुणी प्रसाधनगृहात गेली असताना या व्यक्तीने तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला. आणि तात्काळ कॉलेज व्यवस्थापनाकडे धाव घेतली. त्यांना संपूर्ण माहिती सांगितली. या प्रकरणासंदर्भात पुण्यातील वानवडी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.पुण्यात अनेक कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशाभरातून अनेक तरुण-तरुणी शिक्षण घेण्यासाठी येतात. मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कॉलेजलागत हॉस्टेल आहेत. तर अनेक तरुणी खासगी हॉस्टेलवर राहतात. मुलीच्या सुरक्षेसाठी पालकवर्ग कॉलेजच्या हॉस्टेलला प्राधान्य देतात. यासाठी भरमसाठ पैसे भरतात. मात्र याच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याने तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा