गोल पोस्ट गुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल.

आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल.

उस्मानाबाद, २५ जुलै २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तिचा प्रयत्नात अपयशी ठरला परंतू आता तिच्या वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील नालगांव या गावातील श्रीमती वर्षा पंकज काळे, वय वर्ष २७,या महिलेने काल दिनांक २४ जुलै रोजी ५:४५ च्या सुमारास विष पिऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.

घडलेल्या या प्रकरणावरून पोलीस निरीक्षक विशाल खोसे यांना सरकारतर्फे मिळालेल्या प्रथम खबरेवरून त्यांनी संबंधित महिला श्रीमती वर्षा पंकज काळे यांच्याविरोधात भा. दं.सं. कलम – ३०९ अन्वये आज दिनांक २५ जुलै रोजी गुन्हा नोंदवला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version