गोल पोस्ट गुन्हा शेतातील पीक खाणाऱ्या वासरास मारहाण करून केले विकलांग.

शेतातील पीक खाणाऱ्या वासरास मारहाण करून केले विकलांग.

उस्मानाबाद, २५ जुलै २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील भुसणी तालुक्यातील उमरगा या गावातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. शेतातील पिक वासराने खाल्ले या कारणास्तव शेत मालकाने चक्क त्या वासराला विकलांग केल्याचा अतिशय क्रुर प्रकार काल दिनांक २४ जुलै रोजी घडला.

उमरगा तालुक्यातील भुसणी या गावात काल दिनांक २४ जुलै रोजी ६:०० च्या सुमारास नबीलाल मुस्तफा मुल्ला यांच्या शेतात गावातीलच एक वासरू गेले, आणि त्याने त्या शेतातील उडीद आणि ज्वारी चे पीक खाल्ले. या कारणाने संबंधित शेताचे मालक नबीलाल मुस्तफा मुल्ला यांनी त्या वासराला दगडाने मारले.

क्रुरपणे मारहाण करत नबीलाल यांनी त्या वासराचे मागील २ पाय मोडले. घडलेल्या प्रकारावरून पोलीस पाटील गुलाब सुभाष हिरमुखे यांनी दिलेल्या प्रथम तक्रारीवरुन नबीलाल मुल्ला विरोधात भा. दं. सं.कलम ४२९ यासोबतच प्राण्यांना क्रुरपणे वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ११ अन्वये आज दिनांक २५ जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version