औरंगाबाद जिल्ह्यातून आघाडी हद्दपार

औरंगाबाद: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून महायुतीचे निर्विवादपणे वर्चस्व मिळविले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातून आघाडी मात्र हद्दपार झाल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी झेंडा फडकवला.

मागच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या मत विभाजनामुळे एमआयएमचा एक उमेदवार निवडून आला होता. तीच चूक शिवसेनेच्या नेत्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत केल्याने २०वर्षांपासून खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने पूर्णपणे नियोजन केल्याने त्यांना या निवडणूकीत निर्विवाद यश मिळाले. यामुळे जिल्हयातून आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा