ऑस्ट्रेलियातील वणव्यामुळे न्यूझीलंडमधील आकाश भगवे

ऑस्ट्रेलिया (वृत्तसंस्था) : सध्या ऑस्ट्रेलियात पेटलेल्या वणव्यामुळे न्यूझीलंडच्या आकाशाचा रंग बदलला आहे. न्यूझीलंडचं आकाश या वणव्यामुळे भगव्या रंगाचे झालेले दिसत आहे.
आगीची झळ, धूर या सगळ्याचा परिणाम न्यूझीलंडच्या आकाशाच्या रंगावर झाला आहे. या मोसमात न्यूझीलंडमधील आकाश निरभ्र असते. परंतु ऑस्ट्रेलियात जो वणवा पेटला. त्याचा परिणाम न्यूझीलंडच्या आकाशावर आणि वातावरणावरही झाला. या आगीचा धूर जवळपास २ हजार किमी परिसरात पसरला. रंग बदलल्याने त्याचा परिणाम हवेवरही झाला. ऑस्ट्रेलियातील आगीच्या धुराचे थर न्यूझीलंडच्या आकाशावर पसरले. सध्या भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे.

न्यू साऊत वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारत दौरा रद्द केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा