पुणे, २६ ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात यजमान ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट ठेवून श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने २० षटकात ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेकडून पथुम निसकाने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर मधल्या फळीतील फलंदाज चरीथ असलकाने ३८ धावांची आक्रमक खेळी करत लंकेला १५० च्या पार पोचवलं.
१५८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला वॉर्नर व फिंच ने २६ धावांची सलामी भागिदारी दिली. त्यानंतर आपल्या पहिल्या ओव्हर मध्ये महिषा ने डेव्हिड वॉर्नरला ११ धावावर पहील्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर धनंजयने ने मार्श ला राजपक्षकरवी झेलबाद केले. मार्श ने १७ धावा केल्या तर १२ चेंडू २३ धावा करून मॅक्सवेल ही माघारी परतला. यानंतर स्टॉयनिस ने हसरंगा व तिषणा यांच्यावर हल्ला चढवत केवळ १७ चेंडूत त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं. तो अखेरपर्यंत नाबाद राहत १८ चेंडूवर ५९ धावा ठोकल्या यात ४ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. कर्णधार फीचं ने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसच्या च्या तुफानी खेळीच्या जोरावर तब्बल २१ चेंडू राखून हा सामना खिशात घातला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव