नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी २०२३ : पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणार्या वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. १६ सदस्यीय संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे. तर ग्लेन मॅक्सवेलसह काही स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात ही १७ मार्चपासून होणार आहे. जोश हेझलवूड दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. तर ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि झाय रिचर्ड्सन हे तिन्ही खेळाडू संघात परतले आहेत.
दरम्यान, व्हाइट बॉल म्हणजे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हे तिन्ही मॅच विनर प्लेयर्स आहेत. या तिघांशिवाय ऑस्ट्रेलियाची बाजू कमकुवत दिसत होती. दुखापतीमुळे हे तिन्ही प्लेयर्स ऑस्ट्रेलियन टीममध्ये नव्हते. मात्र, आता फिट होऊन हे तिन्ही प्लेयर्स टीममध्ये परतले आहेत.
- एकदिवसीय मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅस्टन अॅगर, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.
- ऑस्ट्रेलियाचे भारत दौऱ्यातील उर्वरित सामने :
- तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च (इंदूर)
- चौथा कसोटी सामना ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)
- पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च (मुंबई)
- दुसरा एकदिवसीय सामना १९ मार्च (विशाखापट्टणम)
- तिसरा एकदिवसीय सामना २२ मार्च (चेन्नई)
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.