दीड लाख रिक्षा… पण फक्त १५२ नोंदणी! कल्याणकारी मंडळाकडे रिक्षाचालकांची पाठ फिरवली”

राज्य शासनाने रिक्षाचालकांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळा’कडे रिक्षाचालकांनी चक्क पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक रिक्षा असताना, केवळ १५२ रिक्षाचालकांनीच मंडळात नोंदणी केली आहे!

या मंडळातून जीवन व अपंगत्व विमा, आरोग्य लाभ आणि अर्थसहाय्य यांसारख्या सुविधा दिल्या जाणार असतानाही, अपुऱ्या माहितीचा अभाव, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेतील क्लिष्टता आणि जास्त शुल्कामुळे रिक्षाचालक दूर जात आहेत. शिवनेरी रिक्षा संघटनेचे आबा बाबर यांनी सरकारवर टीका करताना सुचवले की, “ओला-उबेरप्रमाणे शासनाने स्वतःचे ॲप सुरू केले, तर त्यातून मिळणारे कमिशन मंडळाच्या निधीसाठी वापरले जाऊ शकते. अशाने रिक्षाचालकांना थेट आर्थिक फायदा होईल.”

रिक्षाचालकांच्या अपेक्षा आणि शासनाची योजना यामधील तफावत अधोरेखित करणारा हा मुद्दा आता अधिकच चर्चेत आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले