केरळ येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्याने बनवला स्वयंचलित थर्मल स्कॅनर

केरळ, दि. २२ जून २०२०: केरळमध्ये एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने स्वयंचलित थर्मल स्कॅनर तयार केले आहे, जे शरीराचे तापमान मोजेल. या स्कॅनरची खास गोष्ट म्हणजे तो शरीराचे तापमान घेण्याबरोबरच लोकांचे फोटोदेखील घेतोे. या विद्यार्थ्याने सांगितले की हे स्कॅनर तयार करण्यास त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागला. तसेच, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी हे स्थापित केले जाऊ शकते.

विद्यार्थ्यांनी सांगितले की हे थर्मस स्कॅनर बनवण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे हे थर्मल स्कॅनर बनवण्यासाठी केवळ दोन व्यक्तीचा सहभाग होता. विद्यार्थ्याने सांगितले की हे थर्मल स्कॅनर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला सहाय्य केले आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तो स्वतः .

हे थर्मल स्कॅनर सहजरीत्या कोठेही हलवता येण्यासारखे आहे. आकाराने लहान असल्यामुळे त्याचे वजन देखील कमी आहे. थर्मल स्कॅनर मोबाईल ला किंवा कम्प्युटरला कनेक्ट होऊ शकते ज्याच्या माध्यमातून थर्मल स्कॅनर मधील सर्व डेटा कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा