गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी अवतरला माकडांचा ‘ पुष्पा राज’; त्याची स्टाईल पाहून तुम्ही देखील व्हाल त्याचे...

अवतरला माकडांचा ‘ पुष्पा राज’; त्याची स्टाईल पाहून तुम्ही देखील व्हाल त्याचे फॅन!

पुणे १७ ऑक्टोबर २०२२ : माकड हे अतिशय चंचल आणि इकडून – तिकडे उड्या मारणारा प्राणी म्हणून ओळखलं जातं. मस्तीसोबत अनेकदा हे प्राणी मोठमोठे प्रतापही करतात. सोशल मीडियावर माकडांचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. यातील काही मजेशीर असतात तर काही भावुक करणारे असतात. पण यावेळी व्हायरल होत असलेल्या माकडाचा व्हिडिओ जरा वेगळा आहे.

व्हिडिओ पाहून असे दिसते की माकड दक्षिण भारतीय चित्रपट ‘पुष्पा’चा हिरो अल्लू अर्जुनचा खूप मोठा चाहता आहे. आणि यातून प्रेरित होऊन तो व्हिडिओमध्ये गाजर खातानाही दिसत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये माकडाला गाजर देण्यात आले आहे, माकड ज्या पद्धतीने ते खात आहे ते पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती माकडाला गाजर देत आहे. फिल्मी हिरोच्या स्टाईलमध्ये माकड गाजर मधेच तोडून खाऊ लागतो. माकडाची गाजर खाण्याची स्टाइल पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. इंस्टाग्रामवर माकडाचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.

हा व्हायरल व्हिडिओ अनेक प्राणी आणि माकड प्रेमी पेजेसनी शेअर केला आहे. हा इंस्टाग्रामवर मंकीविड्झ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून जवळपास ३७ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. हजाराहून अधिक लोकांनी कमेंट करून गोड प्रतिसाद दिला आहे. तुम्हालाही व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या इन्स्टाग्राम लिंकवर क्लिक करून तो पाहू शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version