गोल पोस्ट स्पॉटलाइट जलवा लॅक्मे फॅशन वीक चा, प्रसिद्ध अभिनेत्रींनी केला रॅम्प वॉक

जलवा लॅक्मे फॅशन वीक चा, प्रसिद्ध अभिनेत्रींनी केला रॅम्प वॉक

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२: लॅक्मे फॅशन वीक हा भारतातील प्रसिद्ध फॅशन शो असून या वर्षी हा शो मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या शो मध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी, सुप्रसिद्ध अभिनेत्रींनीं रॅम्प वॉक केला.

लॅक्मे फॅशन वीक २०२२ च्या रविवारच्या चौथ्या दिवसाची सुरुवात जेनेलिया डिसूझा, मौनी रॉय आणि अदिती राव हैदरी यांच्या रॅम्प वॉकने झाली.

अदिती राव हैदरी ही अभिनेत्री पारंपरिक टिश्यू गोल्ड लेहेंगा साडीमध्ये दिसली होती. यासोबत तिने साऊथ इंडियन ज्वेलरी कॅरी केली आहे. या लूकमध्ये अदिती खूपच सुंदर दिसत होती. तर जेनेलिया डिसूजा वरुण आणि निधिकाची शो-स्टॉपर होती. या फॅशन शोमध्ये मौनी रॉयही लेहेंगामध्ये दिसली. यावेळी श्रिया सरनने रॅम्प वॉक केला, त्यादरम्यान तिने पायल सिंघलचे कपडे दाखवले.

मलायका अरोरा, रिया चक्रवर्ती आणि चित्रांगदा सिंग यांनी शोच्या तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version