गोल पोस्ट इतर प्रेमप्रकरणामुळे संपवलं वैशाली ठक्करने स्वतःचं जीवन ?

प्रेमप्रकरणामुळे संपवलं वैशाली ठक्करने स्वतःचं जीवन ?

इंदौर, १७ ऑक्टोबर २०२२ : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. तीच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली. मध्यप्रदेश मधील इंदौर जिल्ह्यात राहत्या घरी वैशालीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. पोलिसांना तीच्या राहत्या घरी एक सुसाईड नोट सापडली, ज्यामुळं तीच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं.

या चिठ्ठीमधे वैशालीने तिचा मित्र राहुल नवलानी आणि त्याच्या बायकोवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले. राहुल तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा असा खुलासा तिने या नोट व्दारे केला. वैशालीने तीच्या आई वडिलांकडे राहुल ला शिक्षा करण्याची मागणी केली. माझ्या आत्महत्येनंतर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे तिने लिहिले.

एप्रिल २०२१ मधे तीने सोशल मीडिया अकाऊंट वर तीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला होता. ती खूप खुष होती. पण महिन्याभरातच तीने तो व्हिडिओ डिलिट करुन आपले लग्न होत नसल्याचे जाहीर केले.
वैशाली हिने, ये रिश्ता क्या केहलाता है, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर्स, ये है अशिकी अश्या अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version