अवैध वाळू उपश्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

इंदापूर: इंदापुर तालुक्यात पोलीसांनी केलेल्या कारवाई मध्ये ३ जेसीबी, ३ ट्रॅक्टर्स, ३ ट्रॉली यांसह ६० लाखांचा माल जप्त करण्यात आला तसेच ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर व भांडगाव येथे भीमा नीरा नदी संगमावर नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करत आहेत. या वाळू तस्करी वरून वादविवाद देखील होत आहेत. याबाबत अनेक तक्रारी जयंत मीना अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे आल्या असता. गुन्हे अन्वेषण विभागाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक यांनी इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत व नीरा नरसिंगपूर व भांडगाव येथे जाऊन माहिती घेऊन अचानक छापा टाकला असता या ठिकाणी आरोपी बेकायदेशीर रीत्या विनापरवाना वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले असता त्यांना ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांचे ताब्यात दिले. या धडस्त्रात ४५ लाख रू/- ३ जेसीबी मशीन प्रत्येकी किंमत १५ लाख रुपये, १५ लाख रु. च्या ३ ट्रॅक्टर, ३ ट्रॉली प्रत्येकी किंमत ५ लाख रुपये, अशी एकूण ६०,००,००० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये इंदापूर पोलीस ठाण्यात ४ चालक आणि ४ मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमध्ये संदीप पाटील, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शना खाली बारामती गुन्हेअन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पवार,
गुन्हेअन्वेषण विभागाचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, सतीश मोरे आरसीपी पथकातील १२ पोलिस जवान यांनी ही कारवाई केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा