अवैद्य वाळू उपश्यावर दौंड येथे पोलिसांची मोठी कारवाई

26

बारामती : दौंड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपश्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये ५८ लाखांचा माल जप्त आणि नाश १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ७ आरोपींना अटक केली आहे.या कारवाईमध्ये दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत, अशी माहिती जयंत मीना अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना खबऱ्यांमार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांनी धाड टाकली या कारवाईमध्ये करणे बाबत सांगितले असता खालील वर्णनाचे साहित्य मिळाले.
1) ४२,००,००० रू/- ७ फायबर बोटी प्रत्येक बोटीची किंमत सहा लाख रुपये अशी एकूण
2) १६ ,००,००) /- रु च्या ८ लहान लोखंडी बोटी त्यामध्ये वाळू काढण्याची इंजन त्याची प्रत्येकी किंमत दोन लाख रुपये अशी एकूण ५८,००,००० रु चा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे व ते जागीच नाश करण्यात आले आहे.ही कारवाई करण्यासाठी बारामती क्राईम ब्रँचच्या अधिकारी आणि जवान यांनी बोटीने नदीपात्रात जाऊन वाळूउपसा सुरू असलेल्या ठिकाणी छापा घातला आणि तात्काळ प्रत्येक बोटीत पोलीस जवान बसवून बोटी खानोटा गावच्या किनाऱ्यालगत आणल्या आणि बोटींचे ऑपरेटर यांना ताब्यात घेऊन धाडसी कारवाई केली.
दौंड पोलीस ठाण्यात ७ बोटींचे चालक आणि ७ मालक अशा १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडीमध्ये संदीप पाटील , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. जयंत मीना अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार विशाल जावळे, अजिंक्य कदम, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच आरसीपी पथकातील १४ पोलिस जवान या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा