सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच ढवळून निघाले आहे. तर भाजपने बहुमत नसताना देखील अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केले आणि जनते समोर येऊन एक स्थिर सरकार स्थापन केल्याचे आश्वासन ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेला दिले.
पण तरीही महाराष्ट्रातील राजकीयस्थिती पाहता राज्यपालांची फसवणूक करुन हे सरकार स्थापन केल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. महाविकासआघाडी ने महाराष्ट्र सरकारचा हा पेच सुप्रीम कोर्टात दाखल केला. सुप्रीम कोर्टाने देखील या प्रकरणात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप घेत नाही हे ही चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी ३० तारखेपर्यंतची मुदत दिली आहे असे भाजपकडून सांगण्यात आले होते तर आता भाजपनेच या विधानाला कलाटणी देत ३० तारीख ही अनऔपचारिक रूपात आहे आणि आम्हाला ७ डिसेंबरपर्यंतचा वेळ राज्यपालांनी द्यावा. अशी आज माध्यमासमोर गरळ ओकली आहे. यामध्ये महाविकासआघाडीने देखील आपल्या १६२ आमदारांच्या पाठिंबाचे पत्र हे राज्यपालांकडे दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी,सेना,काँग्रेसचे दिग्गज ही अजित पवार यांची मनधरणी करण्यामध्ये व्यग्र आहे असे चित्र दिसत आहे.
या सर्व प्रकारात अजित पवार हे वेगवेगळ्या गोष्टींचा गौप्यस्फोट करत आहेत आणि राष्ट्रवादीचा भांडाफोड करत आहे. या नंतर मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हा देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला तर अजित पवारांनी अजूनही उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारलेले नाही. यामुळे सध्या त्यांच्या डोक्यात काय खेळी चालू आहे कोणालाच माहित नाही. या सगळ्या घडामोडी घडत आहे तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघड जागेचे दुखणे झाले आहे हे नक्की!