पुणे, ३ फेब्रुवरी २०२१: अन्न आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. ज्याच्या सेवनाने आपल्याला दिवसभराची उर्जा मिळते. अनेकांना जेवणानंतर काही ना काही सेवन करण्याची सवय असते त्याबद्दल आपण आज जाणुन घेणार आहोत. तसेच फ्रिज मधे कोणते पदार्थ खराब होतात त्याबद्दल ही माहीती घेणार आहोत.
जेवणानंतर या गोष्टी करणं टाळा…..
सिगारेट….
सिगारेट ओढल्याने तुमची पचनक्रीयाच बाधित होत नाहीतर कॅन्सरचा धोका वाढतो.
लगेच झोप….
जेवण केल्यावर लगेच झोपल्यावर गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता वाढते.
फळे खाणं….
जेवण्या दरम्यान किंवा जेवणानंतर फळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
पाणी पिणे….
जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने पाचन प्रक्रियेवर परिणाम होतो. म्हणून जेवण झाल्यावर १५-२० मिनटांनी पाणी प्यावे.
फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवू नका जास्त काळ ठेवले तर खराब होतात….
लोणी….
फ्रिजमध्ये लोणी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.
अंडी…
अंडी फ्रिजमधे ५ आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवू नका.
दूध….
दूधाला आपण नेहमीच फ्रिजमध्ये ठेवण्याला प्राधान्य देतो. पण, दूध ही तीन दिवसाचा वर फ्रिजमध्ये ठेवू नका.
नाॅनव्हेज….
शिजलेले आणि कच्चे मांस फ्रिजमध्ये जास्त ठेवू नका.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव