पुणे, २१ ऑगस्ट २०२२: २० ऑगस्ट २०२२: प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव याला जिममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका आला. सध्या त्याची परिस्थिती नाजूक आहे. पण अशा घटना अनेकांबरोबर घडल्या आहेत आणि घडणार आहेत. वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येणे, वजन वाढल्यानंतर झटका येणे, अशा घटना कायम घडत आहे. यासाठी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्वाच्या टिप्स…
१. तुमच्या शरीराच्या मर्यादा ओळखून मगच व्यायाम करा. जिम ट्रेनरला तशा सूचना द्या.
२. रोज ताजा आणि पोषक आहार घ्या. ज्यामुळे शरीरासाठी आवश्यक गोष्टी मिळतील.
३. व्यायाम करा. तसेच शरीराला चालना द्या. आळशीपणा टाळा. आवश्यक तेथे शरीराची हालचाल करा. उदा. लिफ्टचा वापर टाळा. जवळपास जाण्यासाठी गाडीचा वापर टाळा.
४. तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. तसेच वजनावर लक्ष ठेवा. ते वाढणार नाही, याकडे लक्ष द्या.
५. शक्यतो अल्कोहोल आणि धुम्रपान करु नका. त्यामुळे ह्रदयाच्या झडपांवर दाब येणार नाही आणि ह्रदयविकाराचा धोका टळेल.
६. स्वत:ची नियमित वैद्यकिय तपासणी करा. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या.
७. दिवसभरात भरपूर पाणी प्या. अन्यथा अन्नाचे योग्य पचन न झाल्याने हृदयावर दाब वाढून ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
८. शक्यतो जंक फूड खाणं टाळा. त्यामुळे स्थूलपणा येण्याची शक्यता असते. जेणेकरुन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
सध्याच्या काळात काही ना काही कारणाने ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा प्रकारची काळजी घेतल्याने तुम्ही हृदयविकार टाळू शकता हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस