बाळासाहेब बारवकर यांना महाराष्ट्र शासनाचा कामगार भुषण पुरस्कार प्रदान

नीरा, १० फेब्रुवरी २०२१: पुरंदरच्या बारामतीच्या सीमेवर असलेल्या जुबिलंट लाईफ सायन्ससेस या कंपनीत काम करीत असलेले बाळासाहेब बारवकर यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा  २०१६ चा  “कामगार भुषण ” आणि २०१७ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ”  देण्यात आला आहे. काल ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
राज्यातील प्रत्येक विभागातील कामगार क्षेत्रात काम करणार्या कामगारांना शासना मार्फत दरवर्षी  हे पुरस्कार दिले जातात. यासाठी दर वर्षी राज्यातुन अर्ज मागवून मुलाखती घेऊन अंतिम ५०  ते ५५  कामगारांची पुरस्कारासाठी  निवड केली जाते. सन्मानचिन्ह , १५ ते २५ हजार रोख आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असते.
सन -२०१६ व २०१७ चे पुरस्कार मागील वर्षी जाहीर झाले होते, परंतु कोरोना प्रार्दुभावामुळे पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. या  पुरस्कार वितरनाचा सोहळा काल  ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी  ५.०० वा   कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेनापती बापट मार्ग मुंबई येथील सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. या पुरस्कारासाठी सण २०१७ यावर्षासाठी पुणे जिल्हा ग्रामीण औद्योगीक क्षेत्र व बारामती तालुक्यातुन  श्री. बाळासाहेब आबुराव बारवकर   यांची एकमेव गुणवंत कामगार म्हणुन निवड झाली होती.
बारवकर हे सध्या निंबुत-निरा येथील ज्युबिलंट लाईफ सायसेन्स या पेट्रोकेमिकल या कंपनीत गेली ३० वर्ष इंजिनिअरींग विभागात सुपरवायझर या पदावर कार्यरत आहेत. कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबरच सामाजिक कार्य, वारकरी सांप्रदाय, व्यसनमुक्ती ,स्वछता अभियान, व्रुक्षारोपण, रक्तदान, गरीब गरजु शालेय विद्यार्थांना मदत अशा विविध उपक्रमात त्यांनी बहुमोल कार्य केलेले आहे, या कार्याची दखल घेऊनच शासनाकडुन हा पुरस्कार देण्यात आला.
बारवकर यांना हा पुरस्कार मिळाल्या नंतर कंपनीतील सर्व अधिकारी, कामगार युनियनचे माजी -आजी पदाधिकारी, राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले, सर्व कामगार बांधव, वारकरी सांप्रदाय,व्यसनमुक्ती, संघातील सर्व पदाधिकारी, सहकारी, इतर सामाजिक क्षेत्रातील सहकारी, कुटूंबातील सर्व सदस्य ,मित्रपरिवार, यांनी त्यांचं अभिनंदन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी:  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा