नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुनर्विचार याचिका ही जमियत-उलेमा-ए हिंद या मुस्लिम संघटनेचे मौलाना सय्यद अशहद रशिदी यांनी दाखल केली आहे.
मशिदीचे पतन हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे मत सुप्रीम कोर्टानेच नोंदवले आहे. असे असताना या खटल्याचा निकाल पूर्णपणे हिंदू पक्षकाराच्या बाजूने लावण्यात आला, यावर याचिकेत आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
याचिकेत म्हंटले की, अयोध्येच्या जागी नमाज पठण केलं जात असल्याचा उल्लेख याचिकेत आहे. 1949मध्ये अवैध पद्धतीनं इमारतीत मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही पूर्ण जागाच रामलल्लाला देण्यात आली आहे, असंही म्हटलं आहे.