गोल पोस्ट राष्ट्रीय अयोध्याप्रकरणी सोशल मीडियावर करडी नजर

अयोध्याप्रकरणी सोशल मीडियावर करडी नजर

नवी दिल्ली : अयोध्या प्रश्नावर उद्याच निर्णय येणार आहे. यात पोलिसांची सर्वात जास्त नजर असणार आहे ती सोशल मीडियावर. यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. ज्याद्वारे सामाजिक शांतता भंग केली जाऊ शकते असे सोशल मीडियातील १६५९ अकाऊंटवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या प्रश्नावर कोणतीही चांगली अथवा वाईट पोस्ट करणे टाळा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच अयोध्यातील राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, महाविद्यालयांना ९ ते ११ नोव्हेंबर पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version