नऊ दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. या निकाला विरोधात आव्हान देण्यास काही मुस्लिम मान्यवरांनी विरोध दर्शवला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, नसीरूद्दीन शाह यांच्यासह मुस्लीम समाजातील शंभर मान्यवरांनी विरोध दर्शविला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी अयोध्येतच पाच एकर जागा देण्यात येईल, असा निकाल घटनापीठाने दिला होता.
या निकालानंतर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने यावर फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते.
न्यायालयाचा आदेश दोषपूर्ण असल्यावर सहमती दर्शवत असतानाच अयोध्येचा प्रश्न सतत तेवत ठेवून हानीच होणार आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांना कोणतीही मदत होणार नाही.