वाघापूर येथे आरोग्यप्रभा पिंपरी-चिंचवड आयोजित आयुर्वेद उपचार व आरोग्य संवाद शिबिर संपन्न

पुरंदर, २ नोव्हेंबर २०२०: ‘आरोग्यप्रभा’ पिंपरी चिंचवड आयुर्वेद औषध विक्रेता संघ चिंचवड यांनी वाघापूर, तालुका पुरंदर येथे एक वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य संवाद शिबिराचे आयोजन करून सुमारे ४५० रुग्णांना मोफत उपचार करून औषधांचे वितरण करण्यात आले. त्याच बरोबर विध्दकर्म व अग्निकर्म चिकित्सा, करण्यात आली.

या उपक्रमात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व वाघापूर येथील समस्त ग्रामस्थ सहभागी होते. सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक वैद्य सरिता गायकवाड, वैद्य सुरेखा अत्राम, वैद्य ज्ञानेश्वर सावंत, वैद्य समीर जोंधळे, वैद्य स्वप्निल शिंदे, वैद्य अपुर्वा चिपळूणकर, आरोग्यप्रभाचे मार्गदर्शक गिरिश गांधी असे सुमारे २५ चिकित्सक सहभागी झाले होते. शिबिरातील रुग्णांना पुणे जिल्हा आयुर्वेद रुग्णालयात सवलतीच्या दरात गरजेनुसार पुढील उपचार देण्यात येणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सोपानराव कामठे दिली.

यावेळी वाघापुरचे माजी सरपंच बाजीराव कुंजीर, काँग्रेसचे नेते विकास इंदलकर, उद्योजक नितीन कुंजीर, डॉ नाना कुंजीर, पोलीस पाटील विजय कुंजीर, शिवसेनेचे नेते मनोज कुंजीर, माजी उपसरपंच बाळासाहेब कुंजीर, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाजीराव नाना कुंजीर, शरदचंद्र नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कुंजीर, चांगदेव कुंजीर, पंचक्रोशी विद्यालय वाघापुरचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर, संचालक दत्तात्रय गायकवाड, शिवाजी इंदलकर, उदयराज कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, ह भ प दशरथ इंदलकर, निवृत्ती कुंजीर यांचेसह ग्रामस्थ महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वाघापुरचे सुपुत्र सागर इंदलकर व महेश कुंजीर यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा