बी.जी. कोळसेंचा देवेंद्र फडणवींसाना टोला…

मुंबई, ४ फेब्रुवरी २०२१: विद्यार्थी नेता शरजील उस्मानीला घेऊन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापलं आहे. तर भाजप शरजील च्या हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सारखे राज्य सरकारला धारेवर धरत आहे आणि शरजील उस्मानीच्या अटकेची मागणी करत आहे. जर ही अटक झाली नाही तर भाजप आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे यांनी यावर मौन सोडले आहे.

हिंदू समाज सडलेला आहे, असे वक्तव्य शरजिल उस्मानी या विद्यार्थ्यी नेत्याने एल्गार परिषदेत केला. त्यावरून हिंदू धर्मियांमधे संताप व्यक्त होतोय. मात्र एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे यांनी शरजिलच्या भूमिकेच समर्थन केलं आहे. शरजिल याला मनुवादी म्हणायचं होतं, त्याऐवजी त्यांने हिंदू शब्द प्रयोग वापरला. त्यामुळे कोण्याच्या भावना दुखावल्या आसतील तर मी माफी मागतो, असेही कोळसे म्हणाले.

बी.जी. कोळसेंनी देवेंद्र फडणवींसाना धारेवर धरले…

पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदूना सडके म्हटल्यांने वाद पेटला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरजिलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसें यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना हिंदूचा एवढाच पुळका आहे तर,मग उद्धव ठाकरे यांना का मुख्यमंत्री होऊ दिले नाही? असा सवाल विचारला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा