Baba Ramdev has sparked using ‘Sarbat Jihad’: भारतातील आयुर्वेदिक पतंजली ग्रुपचे प्रमुख बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद शब्द वापरुन नवीन चर्चेला वाचा फोडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.पण नेमक सरबत जिहाद हे प्रकरण काय आहे ? जाणून घेऊया बातमीतून.
तर झाल अस बाबा रामदेव आपल्या पतंजली प्रॉडकच्या सरबताची जाहिरात करत होते.आता जाहिरात म्हंटल तर ती आकर्षित झाली पाहिजे.आपला प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे हा असतो त्याचा मुख्य हेतु, पण कधीकधी हाच हेतु आपल्या अंगाशी सुद्धा येतो.असच काहीतरी बाबा रामदेव यांच्यासोबत सुद्धा पहायला मिळणार का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बाबा रामदेव ” एक कंपनी आहे जी सरबत विकते व त्यातून मदरसे आणि मशीद बनवते. जर तुम्ही ते सरबत प्यायलात तर मशिदी तयार होतात. पण जर तुम्ही पतंजलीच्या गुलाबजेलचा सरबत प्यायलात तर तुम्ही गुरुकुल बनाल.” लव्ह जिहाद, लँड जिहादसारख सरबत जिहादही होतोय.यापासून तुम्हाला स्वत;चा बचाव करायचा आहे. अस त्यांनी म्हंटले आहे.
पण मशिदी आणि मदरसे बनवणारी कंपनी नेमकी कोणती आहे. याच त्यांनी नाव न घेतल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी सुद्धा बाबा रामदेव यांना ॲलोपॅथीच्या औषधांबाबत तसेच कोरोनावरीलऔषधाबाबत अशीच दिशाभूल करणारी विधान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने माफी मागायला भाग पडल होत.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर