१००० किलो सोन्याचे स्वप्न पाहणारे बाबा शोभन यांचे निधन

कानपुर दि. १३ मे २०२० : कानपुर येथील उन्नाव मध्ये १००० किलो सोने असल्याचे स्वप्न पाहणारे बाबा शोभन सरकार यांचे आज (बुधवारी) निधन झालय. त्यांच्या अंत यात्रेला जवळपास १००० हून अधिक भक्तांनी त्यांच्या अंत यात्रेला हजेरी लावली होती.
पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या आश्रमातील आरोग्य धाम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

यांनी काही वर्षांपूर्वी असा दावा केला होता की, उन्नावच्या दौंडियाखेडा गावाजवळील रेवा नरेशच्या किल्ल्यात शिव चबुतऱ्याजवळ १००० टन सोने गाडले आहे. त्यांना ही गोष्ट स्वप्नात दिसली होती व सरकारने हे सोने बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी सांगितले होते.

कानपूर येथील शिवली कोतवाली भागात त्यांचा आश्रम आहे. उन्नाव आणि आसपासच्या भागात शोभन सरकार यांचा चांगलाच प्रभाव आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

कानपूरच्या बिठूरमधील बंदी माता घाटावर बुधवारी दुपारी बाबा शोभन सरकार यांचे पार्थिव गंगा किनारी दहन करण्यात आले.
या वेळी सामाजिक अंतराचा नियम डावलून हजारो बाबा भक्त तेथे उपस्थित होते. या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शोभन सरकार यांचे पार्थिव बिठूरस्थित बंदी माता घाट येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लोक तिथे पोचले, पण सामाजिक अंतर पाळले नाहीत. कानपूर हा कोरोनाचा हॉट स्पॉट आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा