आजच्याच दिवशी झाला होता बाबरी विध्वंस….

पुणे, ६ डिसेंबर २०२०: आज दि ६ डिसेंबर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस बौद्ध धर्मीयांसाठी एक काळा दिवस मानला जातो. तर इतिहासात आजच्या दिवशी आणखी एक घटना घडली होती. ती म्हणजे अयोध्येतील बाबरी विध्वंस प्रकरण.

१५२७ साली मोगल सम्राट बाबर ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद इ.स. १९९२ साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उध्वस्त झाली/करण्यात आली. हिंदू देवता राम ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर ह्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.

६ डिसेंबर १९९२ साली बाबरी पाडण्यात आली तेथून हा वाद आणखी चिघळला. पण सरते शेवटी भाजपच्या शासन काळात सुप्रीम कोर्टातून राम मंदिराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आणि वर्षानुवर्षे चालू असलेला वाद हा कायमचा मिटला. राम मंदिरावर होणाऱ्या धार्मिक राजकारणाला ही कुठेतरी आळा बसल्याचे पहायला मिळाले. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचे दोन्ही पक्षकारांनी स्वागत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा