PFI प्रकरणात बाबरी मशिदीची एन्ट्री

नवी दिल्ली, ३ ऑक्टोंबर २०२२ : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना NIA आणि ATS ने अटक केल्यानंतर आता तपासातून नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ‘बाबरी मशिद नही भुलेंगे’ असा आशय लिहिलेले साहित्य अटक केलेल्या कार्यकर्त्यांकडे सापडल्याचं ATS ने सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता बाबरी मशिदीची एन्ट्री झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून पकडण्यात आलेल्या PFI कार्यकर्त्यांच्या तपासातून दहशतवाद्यांचे कनेक्शन उघडे पडले आहे. शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे शिक्षण देण्यात येत असल्याची माहिती ATS तपासातून समोर आली आहे. त्याचबरोबर PFIच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून व्यवहार झाल्याचा दावा ATS ने न्यायालयात केला. तर दिवसेंदिवस नवीन खुलासे होऊ लागल्याने PFIचे पितळ उघडं पडू लागलं आहे

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA आणि तसंच अंमलबजावणी संचालनालयान ED अशा तपास यंत्रणांनी संयुक्तपणे २२ सप्टेंबर रोजी PFI वर कारवाई केली. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. PFIचे दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली आहे. तसेच PFIच्या ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली आहे. या बंदीनंतर अनेक मुस्लीम कार्यकर्ते आणि संस्थांनी विरोध केला. पाकिस्ताननेही PFIची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

PFI वर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंग सारखे गंभीर आरोप आहेत. तर PFI संघटनेचे डी कंपनी सोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे. PFI चं उद्दिष्ट सरकारी संस्था, नेते, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा विचार करत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्यांच्या टार्गेटवर असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा