गोल पोस्ट गुन्हा जन्मदात्या आईनेच केला चिमुकल्याचा खुन

जन्मदात्या आईनेच केला चिमुकल्याचा खुन

जालना, दि.२६ मे २०२०: अंबड शहरातील आंबेडकर नगर परिसरात सोमवारी ( दि.२५) रोजी सकाळी एका तीन महिन्याच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना घडली होती. परंतू ही हत्या दुसऱ्या कुणी नाही तर खुद्द जन्मदात्या आईनेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर या आईने मध्यरात्री तीन वाजता बाळ हरवल्याचा बनाव करुन अंबड पोलिसात तक्रार देखील दिली होती. नंतर शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या घरासमोरील पाण्याच्या टाकीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अवघ्या सहा तासात या प्रकरणाचा छडा लावला. मयत बाळाची आई पायल जाधव हिच्यावर संशय आल्याने पोलीसांनी चौकशीसाठी तीला ताब्यात घेतले होते. पायल जाधव हिने सासूवर सूड उगवण्यासाठी तीन महिन्याच्या तान्हुल्यास पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची कबुली दिली. पायल जाधव हिला पोलीसांनी अटक केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version