गोल पोस्ट महाराष्ट्र वसईत सनसिटी मैदानावर मजुरांची प्रचंड गर्दी

वसईत सनसिटी मैदानावर मजुरांची प्रचंड गर्दी

मुंबई, दि. २६ मे २०२०: मुंबईतील वसई मधील सन सिटी मैदानावर आज मजुरांची प्रचंड गर्दी झालेली दिसली. वसई रोड रेल्वे स्थानकातून मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्या आज सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या गावी जाण्यासाठी स्थलांतरित मजुरांनी सन सिटी मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

आज स्थलांतरित मजुरांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या उत्तर प्रदेशला जाणाऱ्या आहेत. त्यामुळे सर्व स्थलांतरित मजुरांना वसई येथील सन सिटी मैदानावर बोलवण्यात आले आहे. या ठिकाणी या सर्व मजुरांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर बसच्या माध्यमातून त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने मजुरांसाठी खास बसेसची सुविधा उपलब्ध केली आहे.

सनसिटी मैदानावरचे दृश्य पाहता स्थलांतरित मजुरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सोशल डिस्टंसिंग कोठेही दिसून आलेले नाही. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात त्यांना या मैदानावर बसावे लागले आहे. त्यांच्या सोबत लहान लहान मुले असल्यामुळे त्या लहान मुलांना देखील या उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version