अहवाल निगेटिव्ह असल्याच्या वृत्तावर बच्चन यांनी केला संताप व्यक्त

मुंबई, दि. २३ जुलै २०२०: बॉलिवूडचे महानायक मानले जाणारे अमिताभ बच्चन यांना ११ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांना नानावटी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी या फिरत असलेल्या बातमीला पूर्णविराम लावला आहे. एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले.

प्रसार माध्यमांमध्ये अमिताभ बच्चन हे कोरोना मुक्त झाले आशी बातमी मोठ्या प्रमाणात दखविण्यात येत होती. सर्वत्रच याविषयी चर्चा घुमू लागल्या होत्या. अखेर आता स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या या खोट्या बातम्यांवर संतापले आहेत.

या वृत्ताबाबत संताप व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं असून सोबतच वृत्तवाहिनीचा ‘तो’ व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. याबाबत लिहताना अमिताभ यांनी, ‘ही बातमी चुकीची, बेजबाबदार, बनावट आणि अक्षम्य खोटारडेपणाची आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर सध्या सर्वात वाईट वृताकंन हे सध्या भारतातील वृतवाहिन्या करत आसून TRP साठी फक्त यांना एक मुद्दा लागतो आणि त्याला मसालेदार तडका लावून काहीही वृताकंन करतात असे मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

भारतीय मिडिया हि कोरोना बाबतीतही लोकांना सकारत्मकता सोडून नकारत्मक वृत दाखवून लोकांना सतर्कता कमी आणि घाबरविण्याचे काम करत असल्याचे अनेक नागरिंकाचे मत आहे तर यामुळे लोकांमधे वृत्तवाहिन्यांबद्दल आक्रोश देखील पाहयला मिळतोय.

काही महिन्यांपूर्वीच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली होती. कारण त्याने कोरोना विषयी खोटी बातमी दिली होती. पत्रकाराला अटक होणे ही खरेतर दुर्दैवी गोष्ट आहे. परंतू हे ही विसरता कामा नये की पत्रकारिता ही समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी असते. मात्र सध्याच्या काळामध्ये पत्रकारिता पार लयाला गेली आहे की काय असे भासू लागले आहे. मग तो धार्मिक तेढ असो, एखाद्या विशेष व्यक्तीला लक्ष करणे असो किंवा टीआरपी वाढवण्यासाठी मसालेदार डिबेट घेऊन लोकांची मने विचलित करणे असो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा