बच्चन कोरोना उपचारासाठी नानवटीत की… रुग्णालयाच्या जाहिरातीसाठी….

मुंबई, ६ ऑगस्ट २०२०: अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली आणि संपुर्ण जगभरातील चाहत्यांकडून त्यांच्या साठी प्रार्थना झाल्या. डाॅक्टरांच्या कार्यामुळे आणि चाहत्यांकडून केलेल्या प्रार्थनेमुळे ते सुरक्षित कोरोनावर मात करुन घरी परतले. पण, आता नविन वाद समोर आला आहे.

गेल्या महिन्यात त्यांना कोरोना साथीचा आजार झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. बिग बी आता पूर्णपणे बरे झाले आहे व जलसा येथील त्यांच्या घरी क्वारंटाइन आहे. नानावटी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल आणि टीकाकारांचा सामना करावा लागला. ज्याला त्यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले होते.

वास्तविक, अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर रुग्णालयातील कर्मचार्‍यांची आणि तेथील सुविधांची प्रशंसा केली. त्यानंतर काही ट्रोलर्स आणि समीक्षकांनी त्यांच्यावर रुग्णालयाची जाहिरात केल्याचा आरोप केला. एका महिलेने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली. याचे उत्तर आता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर दिले आहे. तिच्या वडिलांच्या कोरोना तपासणीमध्ये मध्ये रुग्णालयाने चुकीच्या पद्धतीने चाचणी केली असल्याचा आरोप या महिलेने सोशल मीडियावर नानावटी हॉस्पिटलवर केला होता. त्यानंतर त्यांनी बिग बीवर टीका करताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘श्री. अमिताभ, लोकांच्या जीवाची काळजी न घेणाऱ्या आणि फक्त पैसे कमविण्याची इच्छा असलेल्या हॉस्पिटलची जाहिरात तुम्ही करत आहात हे खरोखर वाईट आहे. क्षमस्व, परंतु आपण पूर्णपणे आपला आदर गमावला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्या महिलेच्या प्रश्नाला दिले उत्तर….

अमिताभ बच्चन यांनी त्या महिलेच्या भाषणाला उत्तर देताना आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘तुमच्या प्रिय आणि आदरणीय वडिलांबद्दल आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर मला खरोखर वाईट वाटते. मी लहानपणापासूनच रुग्णालयात जात आहे. वैद्यकीय व्यवसायात एक विशिष्ट आचारसंहिता आहे आणि मी पाहिले आहे की डॉक्टर, व्यवस्थापन, परिचारिका रुग्णांची काळजी घेण्यात गुंतलेली आहेत. अमिताभ बच्चन यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘नाही … मी हॉस्पिटलची जाहिरात करत नाही, नानावटीत मला घेतलेल्या काळजी आणि उपचारांसाठी आणि मला दाखल केलेल्या प्रत्येक रुग्णालयासाठी मी आभार मानू इच्छितो. मी अजून हे करतच राहीन. तुम्ही माझा आदर गमावला आहे, परंतु मी असे म्हणालो की मी कधीही माझ्या देशातील वैद्यकीय व्यावसायिक आणि डॉक्टरांचा आदर गमावणार नाही. ‘ सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा