मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेवरून बच्चू कडू यांचा भाजपला टोला, बेताल वक्तव्य बंद करण्याची केली मागणी

नागपूर १५ जून २०२३ : राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे या जाहिरातीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आज पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना इशारा देताना २०२४ च्या निवडणुकांवरही त्यांनी विधान केलेे. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असेल, तर लोक फार विचार करून भाजप सोबत जातील असे बच्चू कडू म्हणाले.

आगामी निवडणुका महायुती सोबत लढणार का? या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, २०२४ ची निवडणूक सोबत लढलीच पाहिजे. पण आम्ही युतीत असून जर मुख्यमंत्र्यांना असे भाजपचे लोक बोलत असतील, त्यांच्या प्रसिद्धीवर बोलले जात असेल तर मग लोक प्रश्न विचारतील की, भाजप वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन, आपल्याच साथीदारांना कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना?

दोन दिवसांपूर्वी अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हंटले होते, बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले,अनिल बोंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य करतात. त्यांनी लायकी पाहून तरी किमान बोलले पाहिजे. कुणामुळे आपण कुठे आहोत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. बेडूक वगैरे अस अक्कल नसल्यासारखे बोलू नये. त्यांना केंद्रात काही अडचणी येत असतील त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांबाबत असे बेताल बोलत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा