कल्याणमध्ये एमएसआरडीसीचा भोंगळा कारभार

कल्याण, दि. १७ जुलै २०२०: कल्याणच्या पत्रिपुलाचे काम हे मागील दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र अद्यापही काम संथगतीने चालू आहे. दुसऱ्या बाजूला असलेल्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असताना पुलावर मोठं मोठे खड्डे पडल्याने प्रवास करणे कठीन होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी खड्डे बुजवा अशी मागणी केली. मात्र खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि डांबरचा वापर न करता चक्क माती-चिखल याचा वापर केला आहे.

चिखल- मातीचा वापर केल्याने मनसे आमदार राजू पाटील , प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. एकीकडे पुलाचे काम लवकर होत नाही, दुसरीकडे खड्डे अशा प्रकारे बुजवले जात असल्याने एमएसआरडीसीचा भोंगळा कारभार पुढे आला आहे.

दुसरीकडे कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. बहुतांश रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांसाठी काही ठिकाणी सिंगल रस्ता उपलब्ध आहे. परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले आहेत . त्यामुळे कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा