सततच्या पावसाने रस्त्याची दुरावस्था, रस्ता कधी करणार? नागरिकांचा एकच प्रश्न

माळेगाव, १३ ऑगस्ट २०२०: माळेगाव व परिसरात गेली तीन चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे येळेवस्ती येथील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असुन रस्ता कधी होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. माळेगाव येथील येळेवस्ती येथे मोठी रहिवाशी वस्ती आहे. शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. मात्र या वस्ती वरील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी रहिवाशी मागणी करत आहेत.

माळेगाव व परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे येळे वस्तीवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मात्र ये-जा करणा-यांना चिखलातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अनेकदा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. माळेगावचा सर्वांगीण विकास होत असताना केवळ ग्रामपंचायत सदस्यांच्या निष्क्रिय कामाचा फटका नागरिकांना बसत असून लवकरच या रस्त्याचे काम करावे, अन्यथा अंदोलन करण्यात येईल असा इशारा येळेवस्ती येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

या रस्त्याचे काम करण्यासाठी आमदार फंडातून सुमारे पंधरा लाख रुपये मंजूर आहेत. लवकरच या रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे ग्रामपंचायत सदस्या वर्षा पडर यांनी सांगितले

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा