बड्या टेलिकॉम कंपन्यांचे भवितव्य धोक्यात

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने समायोजित महसुलाबाबत (एजीआर) दिलेल्या आदेशानंतर, व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल या बड्या टेलिकॉम कंपन्यांच्या भवितव्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे.
या कंपन्यांना दुसऱ्या तिमाहीत कॉर्पोरेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजेच एकूण ७४ हजार कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. याचा फटका ७० कोटींहून अधिक ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांकडे अधिभार आणि व्याजाच्या रूपात १३ अब्ज डॉलर रुपयांची केलेली मागणी योग्य असल्याचा निकाल दिला होता. त्याचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका बसला आहे.
व्होडाफोन-आयडियाला दुसऱ्या तिमाहीत ५०,९२१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीला ४.९४७ कोटींचा तोटा झाला होता. समायोजित महसुलाची थकीत रक्कम भरण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे भारती एअरटेलला जुलै-सप्टेंबर या तिमाहीत२३,०४५ कोटींचा तोटा सहन लागला आहे. विशेष म्हणजे या कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत ११९ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
याबाबत ट्रायच्या ताज्या आकडेवारीनुसार व्होडाफोन-आयडियाचे ३७.५ कोटी तर भारती एअरटेलचे ३२.७९ कोटी ग्राहक आहेत. तसेच रिलायन्स जिओची ग्राहक संख्या ३४.८ कोटी आहे.
त्यामुळे या तिमाही कंपन्या सध्या खूप तोट्यात जात आहेत. त्याचा परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवर बसणार आहे.

चौकट…
रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर दूरसंचार कंपन्यांवर आधीपासूनच स्पर्धेत टिकण्याचं आव्हान आहे. त्यानंतर आता अब्जावधी डॉलर्सचं कर्ज आहे. व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि इतर दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्या सरकारला१.४ लाख कोटी रुपये देणे बाकी आहे.

चौकट…
दूरसंचार विभागाच्या नव्या माहितीनुसार एअरटेलची 62 हजार १८७ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. तर व्होडाफोन आयडिया यांच्या ५४ हजार १८४ कोटी आहेत. याशिवाय बीएसएनएल, एमटीएनएल यांच्यावरही भार आहे. यामुळे कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा