बगदादी यावर झालेल्या कारवाईचा व्हिडिओ जाहीर.

यु एस: इस्लामिक स्टेट चा मुख्य अबू बकर अल-बगदादी यावर अमेरिकन सैन्याने शनिवारी कारवाई केली होती या कारवाईमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईची चित्रफीत अमेरिकेने जाहीर केली आहे.
व्हिडिओमध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईत आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट झालेले दिसत आहेत. अमेरिकन हेलिकॉप्टर्स ने आतंकवाद्यांचे कंपाउंड नष्ट केल्याचे दिसत आहे. तसेच ज्या इमारती मध्ये बगदादी लपून बसला होता ती इमारतही नष्ट केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने टाकलेल्या बॉम्बच्या धुराचे काळे लोट वर येताना दिसत आहेत. या कारवाईमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही सैन्याची जीवित हानी झालेली नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा