बाहुबली फेम राणा डुग्गुबाती लग्न बंधनात…

12

हैदराबाद , ८ ऑगस्ट, २०२० : काही तासातच टॉलीवूडचा फेमस अभिनेता लग्न बंधनात अडकणार आहे. ज्या काळात जग केवळ कोविढ-१९ नव्हे तर इतर समस्यांपासून ग्रस्त आहे, यावेळी राणा डुग्गुबाती आपल्या चाहत्यांना चांगलाच दिलासा देत आहे. ८ ऑगस्ट ,२०२० रोजी राणा डुग्गुबाती हा आपली प्रेमिका मिहेका बजाज सोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

बुधवारी हैदराबादमध्ये लग्नाच्या पूर्व उत्सवाची सुरुवात हळदी सोहळ्या पासून झाली, आणि त्यानंतर राणा आणि त्याचे कुटुंब मेहंदीला गेले . गुरुवारी, शुक्रवारी अभिनेत्रीच्या घरी पारंपरिक पेली कोडूकु पूजा झाली. तसेच हे लग्न मारवरी आणि तेलुगू या दोन्ही परंपरेने होणार आहे . तसेच सर्वत्र कोरोना असल्यामुळे नियमांचे पालन करत फक्त ३० लोक लग्नाला उपस्थित राहतील याची खबरदारी घेण्यात आली आहे.

तसेच विवाह सोहळा हा राणा यांच्या कौटुंबिक मालमत्ता , रामानायडू स्टुडिओमध्ये होईल. तसेच विवाह स्थळ पूर्णपणे सनिटाईज करण्यात आले आहे. तसेच ३ महिन्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपण प्रेमात आहोत हे जाहीर केलं होतं. आणि आज ३ महिन्यांनंतर लग्न बंधनात अडकण्यासाठी दोघे ही सज्ज आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी :