माढा, दि. ७ ऑक्टोबर २०२०: कुर्डूवाडी येथील महावितरण कार्यालयाअंतर्गत म्हैसगाव तालुका माढा या शिवारातील नांदगाव रस्ता येथे नदीजवळ विनापरवाना रोहित्राचे स्ट्रक्चर उभे केले असल्याने बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी भजने यांनी विद्युत ठेकेदाराच्या अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
महावितरण कंपनीचे ठेकेदार स्वप्निल गायकवाड यांचेसह दोन शेतकऱ्यांविरुद्ध विनापरवाना रोहित्राचे स्ट्रक्चर बेकायदेशीर उभे केल्याने शाखा अभियंता व सहाय्यक प्रभारी अभियंता भाग्यश्री वाघमारे यांनी कुर्डूवाडी येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
याबाबत ठेकेदाराने बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता या प्रकरणी जामीन अर्जावर सुनावणी होऊन ठेकेदाराचे वकिलांनी कस्टडीची आवश्यकता नसल्याचा केलेला युक्तिवाद मान्य करून पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्ती सह जामीन मंजूर केला आहे. यात विद्युत ठेकेदार तर्फे अँड हरिश्चंद्र कांबळे तर सरकार तर्फे अँड दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील