गोल पोस्ट राष्ट्रीय बाजारात लागलेल्या आगीमुळे २२ दुकाने जळून खाक.

बाजारात लागलेल्या आगीमुळे २२ दुकाने जळून खाक.

उत्तर प्रदेशच्या: शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराऊच्या कछोरा गावात फटाक्यांच्या बाजारात अचानक आग लागली. एक दारुडा गर्दीच्या ठिकाणी फटाके जाळत होता , यावेळी एका दुकानाला आग लागली आणि लवकरच ती आग बाजाराच्या २२ दुकानांमध्ये पसरली. विविध ठिकाणी फटाक्यांमुळे स्फोटांच्या जोरदार आवाजाने संपूर्ण बाजार हादरले.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. फटाके जाळणाऱ्या मद्यधुंद युवकाला पकडले . आगीत दहा लाखाहून अधिक रुपयांची नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या क्षणी कोणत्याही दुर्घटनेचे वृत्त नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version