टोकियो, ८ ऑगस्ट २०२१: भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर ८-० ने मात केली. नियाजबेकोव्हने रेपेचेज सामना जिंकल्यानंतर या सामन्यात प्रवेश केला. या विजयासह, बजरंगने विश्व अजिंक्यपद २०१९ च्या उपांत्य फेरीत नियाजबेकोव्हकडून झालेल्या पराभवाचा सूड देखील घेतला.
बजरंगने सुरुवात सावध केली. त्यानंतर पहिला गुण मिळवला आणि त्यानंतर २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत देखील बजरंगने आक्रमक खेळ केला आणि आणखी दोन गुण मिळवत आघाडी ४-०अशी केली. दौलतने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पण बजरंगने त्याची चाल यशस्वी होऊ दिली नाही. अखेरच्या मिनिटात बजरंग आणखी आक्रमक झाला. अखेर बजरंगने ८-२ असा विजय मिळवला.
भारताकडे टोकियो गेम्समध्ये 7 पदके
नीरज चोप्राने भालाफेकात सुवर्ण काबीज केले. यापूर्वी बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये कांस्य जिंकले होते. पैलवान रवी दहिया (५७ किलो वजनी गट) आणि मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदके जिंकली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे