बजरंगी भाईजान झाले ५५ वर्षाचे…….

मुंबई, २७ डिसेंबर २०२०: बाॅलिवूड चा दंबंग खान अर्थात सलमान चा आज ५५ वा वाढदिवस आहे. अनेक दिग्गज व स्टार कलाकार आणि चाहत्यांकडून त्याला सोशल मिडियावरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सलमान चं जन्मनाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे तर त्याचा जन्म २७ डिसेंबर, इ.स. १९६५ रोजी झाला.

व्यक्तिगत माहिती…..

हिंदी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक सलीम खान हे त्याचे वडील असून अरबाझ खान, सोहेल खान हे त्याचे भाऊ आणि बहीण अर्पिता असे भावंड आहेत. २०११ मध्ये त्याने स्वता:ची निर्माण कंपनी काढली. त्या कंपनी चे नाव (SKBH Productions) सलमान खान बीइंग प्रोडकशन आहे. निर्माता म्हणून चिल्लर पार्टी हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्याला अनेक नावाने ओळखले जाते “दबंगखान”, “टायगर खान”, भाईजान”, “सलमान भाई.

सलमान खानने इ.स. १९८८ साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९८९ साली सलमानने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळवून दिला. त्यानंतर साजन (इ.स. १९९१), हम आपके हैं कौन..! (इ.स. १९९४), करण अर्जुन (इ.स. १९९५), जुडवा (इ.स. १९९७), प्यार किया तो डरना क्या (इ.स. १९९८) व बीवी नं. १ (इ.स. १९९९) या इ.स.१९९०च्या दशकात गाजलेल्या चित्रपटांत त्याने अभिनय केला. १९९९ मध्ये सलमान खान ला अतिथि-भूमिका साठी, १९९८ मधील कुछ कुछ होता है ह्या सिनेमा साठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.

चित्रपट कारकीर्द……

पदार्पण आणि सफलता (१९८९-९३): सलमानने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८८ मध्ये सहायक अभिनेता म्हणुन ‘बिवी हो तो ऐसि’या चित्रपतटातुन केली. सुरज बरजात्या यांच्या ‘मैने प्यार किया'(१९८९)हा सलमानचा प्रमुख भुमिका असलेला पहिला चित्रपट होता. या साठी त्याला ‘फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता’चे नामांकन मिळाले होते.

“अबतक ५५” बिन लग्नाचा….

आज सलमान खान हा यशाचा शिखरावर आसला तरी त्याच्या अवतीभवती वाद देखील तसेच राहीले. यापैकी हिप अँड रन केस तर चांगलीच चर्चेत राहीली. वादच नव्हे तर सलमान आणखी एका गोष्टी मुळे नेहमीच चर्चेत आसतो आणि ते म्हणजे लग्न. सलमान खान ५० पेक्षा जास्त वयाचा झाला आज तो ५५ वा वाढदिवस साजरा करतोय पण आतापर्यंत त्याने लग्न केले नाही. तसे अफेयरचे अनेक किस्से समोर आले पण ते तेव्हढ्या पुरतेच रहीले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा