सासवड नगरपरिषद स्विकृत नगरसेवकपदी बाळासाहेब पायगुडे, संजय चौरे यांची निवड

पुरंदर, २४ डिसेंबर २०२०: सासवड नगरपरिषदेच्या सभागृहात आज झालेल्या बैठकीत स्विकृत नगरसेवकपदी बाळासाहेब पांडुरंग पायगुडे आणि संजय मारूती चौरे यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी जाहीर केले.

सासवड नगरपालिकेमध्ये सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह १६ सदस्य असल्यामुळे त्यांच्या गटाचे दोन स्विकृत सदस्य निवडण्यात आले. गटनेत्या आनंदी काकी जगताप यांनी या दोन्ही ही नावांची शिफारस केली.

याप्रसंगी गटनेत्या आनंदी काकी जगताप, नगराध्यक्ष मार्ततंड भोंडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, संदीप जगताप, विजय वढणे, मनोहर जगताप, प्रवीण भोंडे, सचिन भोंगळे, नगरसेविका पुष्पा जगताप, वसुधा आनंदे, माया जगताप, सीमा भोंगळे, मंगल म्हेत्रे, माजी उपाध्यक्ष यशवंत जगताप यांसह पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख, सासवड आणि परिसरातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संदेश मांगडे यांनी सुत्रसंचलन केले तर मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा