बाकसाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

मुंबई : शिवाजी पार्क येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली आहे.
राज्यातील सत्तेचा संघर्ष चिघळलेला असल्याने या वेळच्या स्मृतिदिनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत.

या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणखर भूमिका घेऊन भाजपचा सत्तेचा मार्ग रोखला आहे. आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती विधिमंडळाची सदस्य बनली आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेला कमकुवत पक्ष समजणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी पूर्ण ताकद पक्षाच्या मागे उभी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून बाळासाहेबांना अभिवादन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री १७ नोव्हेंबरपूर्वी बसविण्याचा प्रयत्न होता; मात्र राजकीय परिस्थितीत तो पूर्ण झालेला नसल्याने शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांसाठी दैवत आहेत. त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या किंबहुना देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कला येत असतात. शिवाय विविध राजकीय पक्षाचे जेष्ठ नेत्यांनी या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी आतापर्यत समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा