डोंबिवली, दि.१२ ऑगस्ट २०२०: “गोविंदा रे गोपाळा” म्हणत दरवर्षी बाळकृष्ण हे आपल्या सवंगड्यासह दहिहंडी फोडायला आतूर असतात. दरवर्षी उत्कटतेने दहिहंडी सणाची वाट पाहणाऱ्या गोविंदांच्या उत्साहावर यावर्षी कोरोनाने पाणी फेरले आहे . त्यामुळे लहानग्यापासून ते तरूणांपर्यत , चाळीतल्या दहिहंडी पासून ते थेट जागतिक स्तरापर्यंतच्या सर्वप्रकारच्या दहिहंड्याचा आज शूकशूकाट पाहायला दिसत आहे. मात्र अडजणीमध्ये निराश होईल तो बाळकृष्ण कसला.
कितीही संकट आली तरी आपला आनंद कसा साजरा करायचा हे बाळकृष्णांनी करून दाखवले . या कोरोनाच्या संकटात सुद्धा बाळकृष्णांनी घरीच गोपालकाला साजरा केला. घराच्या बाहेर जाऊन दहिहंडी साजरी करता येणार नाही म्हणून कूटुंबीयांनी घरीच दहिहंडी बांधून लहानग्याचा गोपालकाला साजरा केला.
ज्या पद्धतीने मटक्यात मख्खन , फळ टाकून दही हंडी तयार करतात अगदी त्याच पद्धतीने कूटुंबीयांनी दहिहंडी तयार केली . आपल्या मुलांची आणि सणांची मैत्री व्हावी , मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडून मुलांनी सणाचा आनंद घ्यावा या उद्देशाने कूटूंबीयांनी आपल्या मुलांसोबत गोपालकाला साजरा केला.
न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे