संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान, महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सहकार्याने बालशाहीर, महिला शाहीर पुरस्काराचे वितरण

निगडी, १० मार्च २०२३ : प्रतिवर्षी संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने दिला जाणारा बालशाहीर आणि महिला शाहीर पुरस्काराचे वितरण तुकाराम बीज व शिवजन्मदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी (ता.९ मार्च) सायंकाळी संत तुकाराम महाराज मंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले.

पुरस्कारार्थी बालशाहीर व महिला शाहीर यांच्या जोशपूर्ण पोवाडा सादरीकरणानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले.
बालशाहीर पुरस्कार अनुक्रमे परमवीर आव्हाड, राजरत्न पांडगळे व प्रज्ञेश गायकवाड यांना, तर महिला शाहीर पुरस्कार सौ. भारती फिस्के व सौ ऊर्मिला राजे यांना देण्यात आले.

या पुरस्कारासाठी प्रसिद्ध उद्योजक श्री. दीनानाथ जोशी यांनी अर्थसाहाय्य दिले. तर संजीवनी महिला शाहिरी पथकाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, उद्योजक श्री. दीनानाथ जोशी, संजीवनी महिला शाहीर पथकाच्या अध्यक्षा सौ. वनिता मोहिते, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. नंदू कदम, तसेच हरिभाऊ करमाळकर, माणिकराव अहिरराव, राजेंद्र आहेर उपस्थित होते.

या प्रसंगी बालशाहीर पुरस्कारप्राप्त युवा शाहीर गुरुराज कुंभार, चैतन्य काजूळकर, भक्ती फिस्के यांनीही पोवाडे सादर केले. शाहीर सौ. प्रचिती भिष्णूरकर यांनी सूत्रंचालन केले. कार्यक्रम उत्तम प्रकारे होण्यासाठी शाहीर सौ. चित्रा कुलकर्णी व शाहीर सौ. स्मिता बांदिवडेकर यांनी सहकार्य केले. तर ढोलकीवर सुप्रसिद्ध ढोलकीवादक श्री. उद्धव गुरव; तसेच अमर व ओंकार यांनी साथ दिली, तर हार्मोनियमवर ईशा बांदिवडेकर यांनी साथ दिली.
सौ. वनिता मोहिते यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा